‘अमोल कोल्हे लबाड कोल्हा’; शिवाजीराव आढळराव यांची टीका | पुढारी

‘अमोल कोल्हे लबाड कोल्हा’; शिवाजीराव आढळराव यांची टीका

पुणे, पुढारी ऑनलाईन: खासदार अमोल कोल्हे लबाड कोल्हा आहेत, शिवसेनेतून मोठे होऊन ते शिवसेनेवरच टीका करत आहेत, अशी टीका शिवाजीराव आढळराव यांनी केली. कोल्हे यांचा लबाड कोल्हा असा उल्लेख केल्याने आढळराव आणि कोल्हे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

अधिक वाचा:

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाद सुरू झाला आहे.

तर कोल्हे यांनी ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद असल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत,’ असे म्हटले होते.

या टिकेला उत्तर देताना आढळराव यांनी कोल्हे यांना ‘लायकी पाहून बोलावं, या विषयात पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठून?’ असा सवाल केला आहे. तर ‘हा कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आहे.’ अशी टिकाही केली आहे.

अधिक वाचा:

खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आढळराव म्हणाले, ‘बायपास रस्त्याचं काम मी खासदार असताना सुरू झाले होते. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आले. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता.

मला या कार्यक्रमात बोलवावं एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे? थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावे.

अधिक वाचा:

शिवसेनेत मोठे होऊन सेनेवर टीका

हा लबाड कोल्हा ज्या शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायची ही कुठली पद्धत?

अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नाही.”

हेही वाचलेत का: 

पाहा PHOTOS : मुंबईची पावसाने केली दैना

Back to top button