अनिल देशमुख नाॅट रिचेबल असण्याचे गूढ कायम | पुढारी

अनिल देशमुख नाॅट रिचेबल असण्याचे गूढ कायम

नागपूर पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयानंतरच ईडी च्या चौकशी ला सामोरं जाणार असल्याचं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सोमवारी जाहिर केलं आहे. रविवार, १८ रोजी ईडीच्या पथकांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल तसेच काटोल तालुक्यातील वडविहीरा येथील वडीलोपार्जीत घराची झडती घेतली होती. त्या नंतर सोमवार, १९ रोजी अनिल देशमुख नाॅटरिचेबल असून ते भूमिगत झाल्याच्या बातम्या दिवसभर व्हायरल झाल्या.

दरम्यान अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओ संदेश जारी करण्यात आल्यामुळे त्यांच्या नाॅटरिचेबल असण्यातील गूढ आणखीणच वाढले आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना तयार करण्यात आलेल्या व्हाॅटस अॅपग्रुपवरही हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यात ते अतिशय दबक्या आवाजात बोलत असून कुठे तयार करण्यात आला हे कळू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल आणि वडविहीरा येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या झाडाझडतीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे ते कोणाला सापडले, तर कळवा असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला.

तसेच त्यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे अनिल देशमुख पळाले तर नाही ना? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. त्या नंतर हा व्हिडीओ जारी करण्यात आला. मला ईडीचा समन्स आल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात रितसर याचिका दाखल केली आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्या नंतर मी स्वत: ईडीसमोर माझे म्हणने मांडण्यासाठी जाणार आहे, असे देशमुख यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे वरळीतील घर तसेच त्यांचा मुलगा सलील देशमुख यांनी २००६ मध्ये उरण येथे घेतलेली जमीन आदींचा समावेश आहे. मात्र काही वर्तमानपत्रांनी ही जमीन ३०० कोटी असल्याचे भासवून संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्याचे या व्हिडोओत म्हटले अाहे.

हे ही वाचलत का :

पाहा व्हिडिओ : राष्ट्रवादीची स्थापना आणि कोल्हापुरातील राजकीय भूकंप

Back to top button