Location sharing feature : गुगल मॅपवर लोकेशन शेअर करणारे व्हॉटस्अ‍ॅपसारखे फिचर | पुढारी

Location sharing feature : गुगल मॅपवर लोकेशन शेअर करणारे व्हॉटस्अ‍ॅपसारखे फिचर

न्यूयॉर्क : अँड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फिचर समोर आले आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या लोकेशन शेअरिंग फिचरबाबत Location sharing feature तर तुम्हाला माहितीच आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही दुसर्‍या यूजरला आपले रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकता. आता याप्रमाणाचे फिचर गुगल मॅपवरही मिळणार आहे. गुगलने अलीकडेच गुगल मॅपचे एक नवीन फिचर जाहीर केले आहे. यात व्हॉटस्अ‍ॅपप्रमाणेच लोकेशन शेअरिंग फिचर देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने आता तुम्हाला लोकेशन शेअर करायला कोणत्याही अतिरिक्त अ‍ॅपची मदत घ्यावी लागणार नाही. फक्त अँड्रॉईड फोनमध्येच हे फिचर देण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकेशन शेअर करण्यासाठी कोणतेही अन्य अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज पडणार नाही.

पहिले व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून यूजर लोकेशन Location sharing feature शेअर करू शकत होते. मात्र, गुगलचे हे फिचर थेट अँड्रॉईड फोनमध्येच काम करते. त्यामुळे यूजर्सना अतिरिक्त अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे फिचर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बंद करू शकता. तुम्ही तुमचे लोकेशन एका विशिष्ट वेळेपर्यंतच चालूही ठेवू शकता. म्हणजेच वेळ संपल्यानंतरही लोकेशन शेअर होणे बंद होईल.

सगळ्यात आधी तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर आपल्या गुगल अकाऊंटसह साईनइन करा आणि गुगल मॅप सुरू करा. यानंतर मेन्यू आयकॉनवर क्लिक करा आणि सर्चबारमध्ये संपर्काचे नाव शोधा. यानंतर तुम्हाला ज्याला तुमचे लोकेशन शेअर Location sharing feature करायचे आहे तो कॉन्टॅक्ट निवडा. ती व्यक्ती तुमच्या गुगल कॉन्टॅक्टमध्ये जोडली गेली हे देखील लक्षात ठेवा. कॉन्टॅक्ट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला लोकेशन शेअर हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. नंतर तुम्हाला रिअल टाईम लोकेशन शेअर करायची असलेली वेळ निवडण्यास सांगितले जाईल. तुम्ही लोकेशन तुम्हाला हवं तितका काळ किंवा अनिश्चित काळासाठी शेअर करू शकता. तुम्हाला तुमचे लोकेशन शेअरिंग थांबवायचे असल्यास पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये जाऊन स्टॉप शेअरिंगवर क्लिक करा.

Back to top button