सांगली: खानापूर मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 38 टक्के मतदान | पुढारी

सांगली: खानापूर मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 38 टक्के मतदान

विटा : पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी खानापूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 347 केंद्रावर
आज (दि.७) सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. खानापूर मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 38 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडणे, काही ठिकाणी मतदान यंत्रांची अदलाबदलीसारखे किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत होत आहे.

खानापूर मतदारसंघात 347 केंद्रावर मतदान केंद्रे आहेत. 35 हजार 507 मतदार आहेत. सर्व केंद्रावर सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत च्या चौथ्या टप्प्यात एकूण 37.97 टक्के मतदान झाले. यामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 406 मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. शांततेत पण चुरशीने मतदान झाले.

पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदारसंघात 5.23 टक्के मतदान झाले. यामध्ये एकूण 17 हजार 548 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुसऱ्या टप्प्यात सकाळी सात ते सकाळी अकरा वाजे पर्यंत 15.76 टक्के मतदान झाले. 52 हजार 869 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

तिसऱ्या टप्प्यात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत 27.84 टक्के मतदान झाले. 93 हजार 392 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर चौथ्या टप्प्यात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत 37.97 टक्के मतदान झाले. यामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 406 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा 

Back to top button