बर्फ, वाळू अन् समुद्राचा मिलाफ! | पुढारी

बर्फ, वाळू अन् समुद्राचा मिलाफ!

टोयोकोरो : जगभरात काही अशाही जागा आहेत ज्या पाहिल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण जाते. या जागा पृथ्वीवरील नव्हेत, असेच त्यावेळी वाटून जाते. कोणी तरी कृत्रिम जागा तयार केली असावी आणि तेथे एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असेल, असे विचार अशावेळी मनात येऊन जातात. पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही असते की, अशा काही मोजक्या जागांवर निसर्गाने सौंदर्याची जणू उधळण केलेली असते. जपानमध्ये अशीच एक जागा आहे, ज्यात एकाच वेळी समुद्र, वाळू व बर्फाचा मिलाफ पहायला मिळतो.

जपानमधील आयलंड ऑफ होकाईडो येथे असा समुद्रकिनारा आहे, जो प्रथमदर्शनी कृत्रिम वाटेल. मात्र, एकाच वेळी किनार्‍यावर समुद्र, वाळू व बर्फाचा मिलाफ येथे दिसून येतो आणि आश्चर्य म्हणजे केवळ महिनाभरच असे विहंगम द़ृश्य पाहिले जाऊ शकते.

जपानमधील समुद्र किनारी आकारास येणार्‍या या अनोख्या घटनेस ‘ज्वेलरी आईस’ या नावाने ओळखले जाते. जपानच्या टोयोकोरो या शहरात स्थित किनार्‍यावर दरवर्षी जानेवारी ते फेब-ुवारीदरम्यान हा अद्भुत नजारा पहायला मिळतो. यात एकीकडे पूर्ण बर्फ जमलेला असतो. दुसरीकडे पाण्याच्या लाटा किनार्‍यापर्यंत येतात तर मधोमध वाळूचे साम-ाज्य असते. जानेवारीच्या मध्यापासून साधारणपणे ही प्रक्रिया सुरू होते. समुद्राचा एक भाग बर्फात परावर्तित होऊ लागतो.

संबंधित बातम्या

हा भव्यदिव्य नजारा डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी येथे हजारोंच्या संख्येने नागरिक येत राहतात. वर्षभर याच कालावधीची सर्वांना प्रतीक्षा असते आणि एकदा असा हा नजारा प्रत्यक्षात साकारला गेला की, तो टिपण्यासाठी कॅमेरे पुढे सरसावत राहतात. सोशल मीडियावर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी ही घटना अजब मात्र सौंदर्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

Back to top button