33 वर्षांपासून केस न कापणारी महिला | पुढारी

33 वर्षांपासून केस न कापणारी महिला

न्यूयॉर्क : 1990 पासून एकदाही केस न कापणार्‍या अमेरिकेतील टेनेसी स्टेटमधील निवासी टॅमी मॅनिस या महिलेची गिनिज रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. या महिलेचे केस 5 फूट 8 इंच लांब आहेत. मात्र, ती समोरील व बाजूचे केस वाढवत नाही. याला ‘म्युलेट हेअरकट’ असे ओळखले जाते. एखादी हेअरस्टाईल ज्यामध्ये पुढचे आणि बाजूने केस लहान केले जातात आणि मागे मागे लांब सोडले जातात, याला ‘म्युलेट’ असे ओळखले जाते.

9 फेब्रुवारी 1990 नंतर आपण मागील केस लांब सोडले आहेत, असे टॅमी म्हणते. लहानपणी टिल ट्युजडेच्या ‘व्हॉईस कॅरी’ या व्हिडीओतील एका मुलीपासून प्रेरणा घेत आपण म्युलेट हेअरस्टाईलचा अवलंब केला, याचाही ती उल्लेख करते. 1989 पर्यंत आपण हेअरकट करत असे, याचा आपल्याला खेद होतो, असे ती म्हणते.

Back to top button