‘आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना | पुढारी

‘आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांनी आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच, सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विधानभवन येथे आयोजित पुणे विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपायुक्त रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध उपाययोजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी सुनील फुलारी यांनी पोलिस विभागाच्या तयारीची माहिती दिली.

विविध विभागांकडून आढावा

धरणे, नदीनिहाय संभाव्य पूरप्रवण गावे, रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची प्रमुख ठिकाणे, पूरपरिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना, नागरिकांच्या तात्पुरते स्थलांतरासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था (शेल्टर्स), पशुधनाची काळजी, आरोग्य विभागामार्फत करावयाच्या उपाययोजना, पोलिस विभागाने उपाययोजनांचा आढावा संबंधितांकडून बैठकीत घेतला.

हेही वाचा

Back to top button