महिलेने केले 2761 इमर्जन्सी कॉल | पुढारी

महिलेने केले 2761 इमर्जन्सी कॉल

टोकियो : जगभरात असे अनेक लोक आपल्या विक्षिप्त वर्तणुकीने आणि लहरीपणाने चर्चेत येतात. अशा लोकांचे काही कारनामे अगदी विश्वास ठेवण्याच्या पलीकडे असतात, पण अशा व्यक्तींचे एकच लक्ष्य असते, ते म्हणजे चर्चेत येण्याचे. आता चर्चेत येण्यासाठी कोणी पोलिसांना फोन करण्याचा धोका निश्चितच पत्करणार नाही. आता एखादी व्यक्ती यापुढेही जाऊन असे करत असेल तर ती यात तरबेज असेल, असेच दिसून येईल. पण, जपानमधील एका महिलेने पोलिसांना थोडेथोडके नव्हे तर 2700 वेळा कॉल करण्याचा आततायीपणा केल्याचे उघडकीस आले आहे.

जपानमधील चिबा प्रांतातील ही घटना असून 2 दिवसांपूर्वीच येथील पोलिसांनी निरोको हतागामी या 51 वर्षीय महिलेला अडीच हजारांहून अधिक फोन कॉल करून त्रस्त केल्याबद्दल ताब्यात घेतले. तिने ऑगस्ट 2020 ते मे 2023 या कालावधीत अग्निशमन दलाला 2761 कॉल केल्याचे चौकशीअंती आढळून आले. कधी घरातून, कधी पार्कमधून तर कधी आणखी कुठून तरी, असे सातत्याने ती कॉल करतच राहिली.

आता ती असे कॉल का करायची, याचे उत्तर निव्वळ गर्भगळीत करणारे आहे. ‘मला खूप एकाकी वाटायचे. माझ्याशी कोणी तरी बोलावे, संवाद साधावा, असे वाटायचे आणि यातून मार्ग काढण्यासाठी मी फोन करत असे. कधी नशेचा ओव्हरडोस झाल्याचे सांगितले, कधी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. पण, ज्यावेळी तिला वैद्यकीय मदत पाठवली, त्यावेळी ती मदत घेण्यास मी नकार देत असे’, असे तिने यावेळी सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे, जपानमध्ये तब्बल 15 लाखांहून अधिक लोक एकाकीपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button