चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे! | पुढारी

चहा पिण्याचे 'हे' आहेत फायदे!

नवी दिल्ली : कोणत्याही गोष्टीचा तारतम्याने वापर केला तर त्याचा लाभ होतो नाही तर मग नुकसानच होत असते. चहा, कॉफी, चॉकलेट यासारख्या गोष्टींबाबतही ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा नियम लागू होतो. मर्यादित प्रमाणात चहाचे सेवनही आरोग्याला लाभदायक ठरू शकत असते.

चहामध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही गुणकारी असतात. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते. वजन कमी करण्यासाठीही ग्रीन टी पिला जात असतो. पचनक्रिया चांगली होणे तसेच बद्धकोष्ठता दूर होणे यासाठी हर्बल चहा गुणकारी ठरतो.

चहामध्ये काही प्रमाणात कॅफेन असते. त्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. चहा हा पाण्याचा बनलेला असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यासही त्याचा उपयोग होतो. चहामधील नैसर्गिक घटक दातांच्या आरोग्यासाठीही चांगले असतात.

Back to top button