फ्रान्समध्ये सापडले रोमन युद्धदेवतेच्या मंदिराचे अवशेष | पुढारी

फ्रान्समध्ये सापडले रोमन युद्धदेवतेच्या मंदिराचे अवशेष

पॅरिस : वायव्य फ्रान्समध्ये पुरातत्त्व संशोधकांना रोमन संस्कृतीमधील युद्धदेवतेच्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील आहेत. युद्धदेवता मार्सचे हे मंदिर असावे असे संशोधकांना वाटते.

हे मंदिर किंवा मठ 17 एकरांच्या विस्तीर्ण जागेत होते. ब्रिटानीमधील ला चॅपेल-डेस-फौगेरेझ येथील उत्खननात या मंदिराचे अवशेष सापडले. त्याचा आकार पाहता हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते असे दिसून येत असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह आर्कियोलॉजिकल रिसर्चमधील फँ्रकॉईज लाबौनी-जीन यांनी दिली. या भागात यापूर्वी 1970 व 1990 च्या दशकातही उत्खनन करण्यात आले होते. आता 2022 पासून याठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आले व तिथे या मंदिराचे अवशेष सापडले. 2022 मध्ये याठिकाणी रोमन युद्धदेवता मार्सची एक मूर्ती सापडली होती. त्यामुळे हे मंदिर याच देवतेचे असावे, असे संशोधकांना वाटते.

Back to top button