जुनो यानाने पूर्ण केले ‘गुरू’भोवतीचे 50 फेरे | पुढारी

जुनो यानाने पूर्ण केले ‘गुरू’भोवतीचे 50 फेरे

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू हा ग्रह नेहमीच शास्त्रज्ञांना आकर्षित करतो. या ग्रहाबाबत संशोधन करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्थान नासाने 2011 मध्ये ‘जुनो’ हे अंतराळ यान प्रक्षेपित केले. हे यान 2016 मध्ये गुरूच्या कक्षेत पोहोचले होते. तेव्हापासून ते गुरूचेे सातत्याने निरीक्षण करत आहे. ‘जुनो’ने 8 एप्रिल रोजी आपला 50 वा क्लोज पास पूर्ण केल्याची माहिती ‘नासा’ने दिली. म्हणजेच ‘जुनो’ने ‘गुरू’भोवती आपला 50 वा फेरा पूर्ण केला.

‘जुनो’च्या जुनोकॅम इमेजरने आतापर्यंत अनेक छायाचित्रे टिपली आहेत. ‘नासा’च्या माहितीनुसार, 2016 मध्ये गुरूवर पोहोचल्यानंतर, ‘जुनो’च्या जुनोकॅम इमेजरने गुरू आणि त्याचे प्रमुख चंद्र गॅनिमेड, युरोपा आणि आयओची अनेक आकर्षक छायाचित्रे टिपली आहेत.

‘जुनो’चा 50 वा फेरा साजरा करताना ‘नासा’ने जुनोकॅमने टिपलेली 50 छायाचित्रे कोलाजच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. ‘नासा’ने सांगितले की, 50 छायाचित्रे असलेले एक ग्राफिक तयार करण्यात आले आहे. जुनोकॅमने घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये गुरू तसेच त्याचे चंद्र गॅनिमेड, युरोपा आणि आयओ तसेच पृथ्वीचाही समावेश आहे.

खगोल शास्त्रज्ञांसाठी गुरू ग्रह जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्याचा चंद्र युरोपाही महत्त्वाचा आहे. युरोपा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा किंचित लहान आहे. शास्त्रज्ञांच्या मते, युरोपाच्या गोठलेल्या पृष्ठभागाखाली महासागर दडलेला आहे.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो