Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा | पुढारी

Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :  भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur)

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट व्यासाची ही पाईप लाईन रस्त्याच्या अगदी कडेला खुदाई करून टाकण्यात आली होती. मात्र अलीकडेच कोल्हापूर-परिते -गारगोटी या राज्यमार्गाचे हायब्रीड ॲन्युटी योजनेतून रुंदीकरण, मजबुतीकरण आणि फेरडांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्याची रुंदी वाढल्याने पूर्वी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या थेट पाईपलाईनच्या व्हॉल्वचे अंतर रस्त्याच्या बाजूपट्टी पासून अगदी फूट-दीड फुटावर आले आहे. हा व्हॉल्व वाहनासाठी धोकादायक ठरत आहे. (Kolhapur)

कोल्हापूर ते फोंडा घाट हा रस्ता सध्या सुस्थितीत असल्यामुळे कोकण-गोव्याला जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र वर्दळ या रस्त्यावर असते. विशेषतः अवजड वाहने, ट्रेलर, मोठे कंटेनर या मार्गाने ये-जा करीत असतात. रात्री – अपरात्री धावणारी ही अवजड वाहने सुद्धा रस्त्याकडेच्या या व्हॉल्व साठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे हा व्हॉल्व अन्य ठिकाणी शिफ्ट करावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button