Japan : जपानच्या किनार्‍यावर आला रहस्यमय गोळा | पुढारी

Japan : जपानच्या किनार्‍यावर आला रहस्यमय गोळा

टोकियो : अनेक वेळा अनपेक्षितपणे काही अनोख्या वस्तू समोर येतात आणि जग चकीत होऊन जाते. आताही जपानमध्ये अशीच घटना घडली आहे. तिथे समुद्र किनार्‍यावर एक गोलाकार, गूढ वस्तू आढळून आली. अचानक हा मोठा सफेद गोळा किनार्‍यावर दिसल्यावर गोंधळ उडाला आणि प्रशासनाला मोर्चा सांभाळावा लागला. (Japan)

ही घटना जपानच्या हमामात्सू या तटीय शहरातील आहे. हा एक मोठ्या आकाराचा धातूचा गोळा आहे जो रहस्यमयरीत्या किनार्‍यावर दिसून आला. हा गोळा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या गोळ्याचा आकार दीड मीटरच्या आसपास आहे. सध्या बॉम्ब निकामी करणारे पथकही त्याची तपासणी करीत आहे. जपानी नौदल आणि कोस्ट गार्डची टीमही या गोळ्याच्या तपासणीत गुंतली आहे. मंगळवारी एका महिलेला हा गोळा सर्वप्रथम दिसून आला. तिने तत्काळ त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली आणि हा गोळा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. या गोळ्याच्या तपासणीसाठी जपानी सेल्फ डिफेन्स फोर्समधील बॉम्ब निकामी करणारे पथक तैनात करण्यात आले व तपासणीसाठी हे क्षेत्र सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले. हळूहळू अन्यही वेगवेगळ्या पथकांना तिथे पाचारण करण्यात आले. अमेरिकेत व अन्य ठिकाणी आढळलेल्या चिनी फुग्यांच्या पार्श्वभूमीवरही याठिकाणी सतर्कता बाळगली जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

Back to top button