करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी संधी शोधल्‍या पाहिजेत : विश्वास नांगरे- पाटील | पुढारी

करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी संधी शोधल्‍या पाहिजेत : विश्वास नांगरे- पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : करिअर निवडताना स्‍वत:च्या क्षमता तपासल्‍या पाहिजेत. स्‍वत:च्या उपजत क्षमता तपासल्या पाहिजेत, असे प्रतिपादन मुंबई पोलिसमधील सहपोलिस आयुक्त (जॉईंट सी. पी. लॉ अँड ऑर्डर मुंबई) विश्वास नांगरे- पाटील यांनी केले.

‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन 2021 भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. www.pudhariexpo.com या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे.

यावेळी पहिल्‍या सत्रात प्रमुख वक्‍ते विश्वास नांगरे- पाटील यांनी आपल्‍या खास शैलीत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला त्‍यांनी पुढारीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्‍य काळाला सामोर ठेवून विद्याथ्‍यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.

पुढारीचा हा उपक्रम स्‍तुत्‍य असून, कोरोना काळात महाराष्‍ट्रातील युवक युवतींना याचा लाभ होणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

लहानपणीची आठवण सांगताना नांगरे- पाटील यांनी आमच्या गावात पुढारी पेपर यायचा. त्‍यावेळी विश्वसंचारमुळे सामान्य ज्ञानात भर पडली. वाचकांच्या पत्रव्यवहारात देखील माझे पत्र छापून आलं होतं.

ते मी जपून ठेवल्‍याचं ते म्‍हणाले. पुढारीकार ग. गो. जाधव सर्वांचे प्रेरणास्‍थान असल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केली.

पुढे बोलताना त्‍यांनी आपल्‍या आयुष्‍यातील प्रसंग, त्‍यांना विद्यार्थी दशेपासून अधिकारी पदापर्यंतच्या प्रवासात आलेले अनुभव कथन केले.

यावेळी त्‍यांनी विद्याथ्‍यांना मार्गदर्शन करताना इयता १० वी १२ वीच्या झटक्‍यानं खचायचं नाही.

यशाने हूरळूनही जायच नाही. जोपर्यत यशस्‍वी होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायच नाही, असे विवेचन त्‍यांनी केल.

करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी त्‍यातील संधी शोधल्‍या पाहिजेत. संधीशिवाय करिअरचे मार्ग निवडणे योग्‍य नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात स्‍वत:ला शोधण्याच्या संधी आपल्‍याला मिळालेल्‍या आहेत. त्‍याचा आपण उपयोग केला पाहिजे, असा मंत्र त्‍यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांनी स्‍वत:हून स्‍वत:ला शिक्षित केले पाहिजे. नकारात्‍मकता बाजूला ठेवून सकारात्‍मक दृष्‍टीने प्राप्त परिस्थितीकडे आपण जेव्हा पाहू तेव्हा आपल्‍याला यश मिळेल असा संदेश त्‍यांनी दिला.

कष्‍ट आणि स्‍मार्ट वर्क केल्‍याशिवाय आपल्‍याला पुढे जाता येणार नाही. हे करत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून करिअर केलं पाहिजे.

कितीही उंच भरारी मारली आणि सामाजिक बांधिलकी नसेल तर त्‍याला अर्थ नाही. त्‍यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान असले पाहिजे, असे विवेचन त्‍यांनी केलं.

करिअर संदर्भातील माहितीचा खजिना आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन वाटा यासंदर्भात मार्गदर्शन करणार्‍या संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तूत- ‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे आज (शनिवार) शानदार उद्घाटन झाले.

यातून नामवंत शैक्षणिक संस्थांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे तर सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत. 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

दै.‘पुढारी’च्या वतीने 2009 पासून ‘पुढारी एज्युदिशा’ शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच ऑनलाईन स्वरूपाचे राज्यस्तरीय प्रदर्शन घेण्यात येत आहे.

10 वी आणि 12 वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे शिक्षणांची अनेक दालने असतात. विद्यार्थी व पालक करिअरची दिशा ठरविण्याविषयी योग्य पर्यायाच्या शोधात असतात.

अशावेळी विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय ठेवून त्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दै. ‘पुढारी’ने 12 वर्षांपूर्वी एज्युदिशा शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात केली.

दरवर्षी प्रत्यक्ष होणारे हे प्रदर्शन कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

एका क्लिकवर पहा व्याख्यान

व्याख्यानांच्या दालनावर क्लिक केल्यावर त्यावेळेस सुरू असलेल्या अथवा होऊन गेलेले व्याख्यान विद्यार्थी,

पालकांना पाहावयास मिळणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 प्रदर्शनाची वेळ असणार आहे.

तसेच विद्यार्थी व पालकांना प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून विनामूल्य नोंदणी करता येणार आहे.

हे प्रदर्शन मोबाईल, पी.सी, लॅपटॉप, इंटरनेट यासह स्मार्ट टी.व्ही.च्या माध्यमातून एकत्रित घरबसल्या तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे.

विद्यार्थी व पालकांना मिळणार त्यांच्या प्रश्नांची उत्तरे…

प्रदर्शनात नामांकित, मान्यताप्राप्त विद्यापीठे महाविद्यालये व कोचिंग क्लासेस स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे.

यामुळे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नामांकित संस्थांचे कौन्सलर व तज्ज्ञांकडून घरबसल्या कॉल, चॅट व व्हिडीओ कॉलद्वारे मिळणार आहेत.

अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, मोटिव्हेशनल स्पीकर यांचे लाईव्ह वेबिनार यांच्या माध्यमातून शिक्षणामधील न्यू रिअ‍ॅलिटी समजून घेता येणार आहे.

अ‍ॅग्रीकल्चर, एव्हिएशन, हॉटेल मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, नर्सिंग, होमिओपॅथी, फायर इंजिनिअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी डिस्टन्स लर्निंग, स्पर्धा परीक्षा, आर्टस्, कॉमर्स, सायन्स विषयांबद्दलच्या माहितीचा प्रदर्शनात समावेश असणार आहे.

अधिक महितीसाठी 9545327545 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

असे पाहता येईल एज्युदिशा प्रदर्शन

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत.

यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल असे दोन पर्याय असतील.

यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील.

त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल.

त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

पहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

 

Back to top button