Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मंचावरील छोट्या दोस्तांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. (Amruta Khanvilkar ) नुकतंच या मंचावर चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीने चंद्रा सिनेमातल्या बाई गं या गाण्यावर परफॉर्म केलं. ८ वर्षांच्या श्रीमयीचा हा परफॉर्मन्स पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या नृत्याच्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर श्रीमयीच्या गाण्याची झलक शेअर करत तिने श्रीमयीला शुभेच्छा दिल्या आहेत. (Amruta Khanvilkar)
श्रीमयीला शुभेच्छा देताना अमृता म्हणाली, ‘चंद्रमुखी सिनेमातील दोन अविस्मरणीय गाणी चंद्रा आणि बाई गं खूप लोकप्रिय झाली. अनेक फॅन्स, अनेक छोट्या मुली या गाण्यावर नृत्य करताना दिसल्या आणि अजूनही दिसतात. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमामध्ये ८ वर्षांच्या श्रीमयीने माझ्या अत्यंत प्रिय गाण्यावर हा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स केला. खरं सांगू तर अशा चिमुकल्यांना जेव्हा लावणी अश्या प्रकारे सादर करताना बघते तेव्हा प्रचंड आनंद होतो. या गोड चंद्राला आभाळभर शुभेच्छा…खूप मोठी हो’ अश्या शब्दात अमृताने श्रीमयीचं कौतुक केलं.
- चंद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी
- Solutions on Bad Mood : मूड चांगला ठेवण्यासाठी ‘हे’ करुन पाहा
- नगरकरांना भेडसावते आहे कृत्रिम पाणीटंचाई