मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अस्तित्व? | पुढारी

मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अस्तित्व?

लंडन : मंगळावर एके काळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती हे स्पष्ट झालेले आहे. मात्र, आजही मंगळावर पाण्याचे अस्तित्व असेल असे कुणाला वाटत नाही. हा एक कोरडाठाक ग्रह आहे अशीच धारणा आहे. मात्र, मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाखाली द्रवरूप पाण्याचे अस्तित्व असावे असे संशोधकांना वाटत आहे.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले. मंगळावरील तापमान अतिशय कमी असते व हा एक कोरडा ग्रह आहे असेच मानले जाते. मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाची टोपी (आईस कॅप) आहे. या बर्फाच्या आवरणाखाली द्रवरूपात पाणी असावे असे खगोलशास्त्रज्ञांना आता वाटत आहे. जर ते खरे ठरले तर हा एक मोठाच शोध ठरू शकतो.

जर हे पाणी द्रवरुपात असेल तर ते खारे असणार नाही. हे एक पेयजलच असेल व त्याच्या अस्तित्वामुळे तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टीचे अस्तित्व असू शकते. मंगळावरील जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत हा कयास एक मोठा आशेचा किरण घेऊन आलेला आहे. अर्थात याबाबत आणखी मोठे संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मंगळभूमीवर क्युरिऑसिटी, पर्सिव्हरन्ससारखे अनेक रोव्हर आहेत. या रोव्हर्सकडूनही तिथे जीवसृष्टीचा शोध घेतला जात आहे.

Back to top button