चंद्रावर लवकरच उतरणार जपानी लँडर | पुढारी

चंद्रावर लवकरच उतरणार जपानी लँडर

टोकिओ : प्रथमच एक खासगी कंपनी आपला रोव्हर चंद्रावर पाठवणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी स्पेस एक्स आपल्या फाल्कन-9 नामक रॉकेटच्या मदतीने टोकिओमधील एक खासगी कंपनी आयस्पेसचे Hakuto-R lander या लँडरला घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या लँडरसोबत संयुक्त अरब अमिरातीचाही एक रोव्हर पाठविला जाणार आहे.

आयस्पेसचे हाकूतो-आर-लँडर हे चंद्राच्या अ‍ॅटलास क्रेटरनजीक सॉफ्ट डाऊन टच करणार आहे. असा प्रयत्न पहिल्यांदाच एका खासगी कंपनीकडून करण्यात येत आहे. हाकूतो-आर-लँडरला 30 नोव्हेंबर रोजी केप कॅनारवेल स्पेस फोर्स स्टेशनवरून पहाटे 3.39 वाजता लाँच करण्यात येणार आहे. हे लँडर एप्रिल 2023 मध्ये चंद्रावर पोहोचणार आहे. चंद्रावर लँडिंग केल्यानंतर हाकूतो-आर-लँडरकडून संयुक्त अरब अमिरातचे राशिद नामक रोव्हर चंद्रावर उतरवणार आहे. हे चार चाकांचे रोव्हर चंद्रावर सुमारे 14 दिवस राहणार आहे.

आपल्या 14 दिवसांच्या वास्तव्यात संयुक्त अरब अमिरातचे रोव्हर हाय रिज्युल्यूशन कॅमेरा, एक थर्मल इमेजर आणि एक मायक्रोस्कोपिक इमेजर आणि चंद्रावरील आवेशित किरणांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोबचा वापर करणार आहे. तसे पाहिल्यास खासगी कंपन्यासाठी चंद्रावर सुरक्षित लँडिंग अत्यंत आव्हानात्मक असते. कारण खासगी कंपन्यांकडे सरकारी संसाधने नसतात. 2019 मध्ये खासगीरित्या तयार करण्यात आलेले स्पेससेलचे बेरेशिट लँडर चंद्रावर लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. मात्र, जपानची ही मोहिम मानवी लँडिंगच्या दिशेने उपयुक्त ठरणार आहे.

Back to top button