आण्विक युद्धामुळे मानवजातीचा सर्वनाश शक्य! | पुढारी

आण्विक युद्धामुळे मानवजातीचा सर्वनाश शक्य!

मॉस्को : पृथ्वीवरील मानवजातीचा अंत होण्याचा अंदाज व्यक्त करणार्‍या धोक्याचा इशारा देणार्‍या घड्याळाने संकेत दिले आहेत की, माणसाच्या दुर्लक्षामुळे आता जगाची आण्विक युद्धाकडे वाटचाल होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष वाढतच आहे. धोक्याच्या घड्याळावर नियंत्रण ठेवणार्‍या बुलेटिन ऑफ द अ‍ॅटोमिक सायंटिस्ट मॅगेझिननुसार, आण्विक युद्ध अथवा जागतिक तापमान वाढ यांसारख्या समस्यांमुळे मानवजात स्वतःलाच उद्ध्वस्त करण्याच्या जवळ असल्याचे संकेत या घड्याळाने दिले आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील नऊ महिन्यांच्या युद्धादरम्यान अनेक वेळा आण्विक हत्यारांचा वापर करण्याची धमकी दिली गेली आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आण्विक हत्यारांची निर्मिती झाल्यानंतर जगभरात सातत्याने धोक्याची घंटा वाजत आहे. रशियन लष्करी अधिकारी युक्रेनवर आण्विक हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जगाचा सर्वनाश होऊ शकतो. त्यामुळे माणसाने आता जागे (वेक अप अलार्म) होण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, हे धोक्याचा इशारा देणारे घड्याळ 1947 मध्ये स्थापित करण्यात आले होते. त्याला 24 वेळा रिसेट केले आहे. मध्यरात्रीचा काळ अखिल मानवजातीसाठी धोकादायक असल्याचे संकेत या घड्याळाकडून मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Back to top button