कृष्णविवरांच्या धडकेने सिद्ध केला आईन्स्टाईनचा सिद्धांत | पुढारी

कृष्णविवरांच्या धडकेने सिद्ध केला आईन्स्टाईनचा सिद्धांत

वॉशिंग्टन : शंभर वर्षांपूर्वी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी कृष्णविवरांबाबत एक सिद्धांत मांडून त्याबाबतचे भाकीत केले होते. आता दोन कृष्णविवरांच्या धडकेच्या अभ्यासातून आईन्स्टाईन यांनी मांडलेला हा सिद्धांत सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ज्यावेळी दोन प्राचीन कृष्णविवरे एकमेकांना धडकतात आणि एकमेकांमध्ये विलीन होतात त्यावेळी त्यांची एक चक्राकार गती दिसून येते. त्यामधून गुरुत्वाकर्षण लहरी निर्माण होतात. या लहरी बाहेरील बाजूस उत्सर्जित होऊन अवकाशात पसरतात. त्यामधून ऊर्जाही उत्सर्सित होत असते. खगोल शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम 2020 मध्ये या लहरींचा छडा लावला होता. अमेरिकेतील लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरीचा यासाठी उपयोग करण्यात आला. तसेच इटलीतील व्हर्गो ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सेन्सरचाही वापर करण्यात आला.

आता या वेव्ह पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी याची पुष्टी केली आहे की ही दोन कृष्णविवरे अक्षरशः वेड्यासारखी व यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अंशात वेगाने फिरत होते. यापूर्वी कोणत्याही आढळलेल्या कृष्णविवराच्या तुलनेत या कृष्णविवरांचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग दहा अब्ज पटीने अधिक वेगवान होता असे आढळून आले.

Back to top button