माणसाच्या वयापेक्षा तीन वर्षे तरुण राहते यकृत | पुढारी

माणसाच्या वयापेक्षा तीन वर्षे तरुण राहते यकृत

बर्लिन ः आपल्याच शरीराविषयीची अनेक प्रकारची माहिती आपल्याला नसते. संशोधकही वेळोवेळी अशी नवीन माहिती उजेडात आणत असतात. आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे की माणसाचे जितके वय असते त्यापेक्षा त्याचे यकृत तीन वर्षांनी तरुण राहते. मद्यपानासारख्या अनिष्ट सवयी नसल्या तर यकृताचे असे तारुण्य अन्य अवयवांच्या तुलनेत नेहमी टिकून राहत असते.

मेथोमेटिकल मॉडेलिंग व रेट्रोस्पेक्टिव्ह रेडिओकार्बन वर्थ डेटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही बाब समोर आली आहे. 20 व्या शतकात आण्विक चाचणीनंतर वातावरणात मिसळणारे कार्बन आयसोटोपच्या आधारे संशोधकांना काही तथ्ये मिळाली. वृद्धत्वाकडे झुकताना आपल्या यकृतावर त्याचे परिणाम दिसत नाहीत. मात्र, यकृतात विषारी पदार्थ जाऊ नयेत हे पथ्य माणसाने पाळणे गरजेचे आहे. हानी झालेली असताना स्वतःला बरे करण्याची अनोखी शक्ती यकृतामध्ये असते.

जर्मनीतील ड्रेसडेन विद्यापीठातील संशोधक ओलाफा बर्गमन यांनी सांगितले की तुम्ही विशीतील आहात की ऐंशीतील, त्याचा काही फरक पडत नाही. याचे कारण तुमचे यकृत सरासरी वयाच्या तीन वर्षांनी लहान असते. संशोधकांच्या टीमने 20 ते 84 वर्षे वयोगटातील 50 लोकांचा अभ्यास केला. त्यामध्ये त्यांची उत्तरीय तपासणी अहवाल व बायोप्सीतील नमुन्यांचेही विश्लेषण करण्यात आले. जुन्या पेशींची जागा नव्या पेशी घेत असतात. हे काम यकृत सहजपणे करते. यकृताचा एक छोटा भागही दहा वर्षे जिवंत राहू शकतो.

Back to top button