बर्लिनमध्ये कोल्ह्याने चोरले शंभर बूट! | पुढारी

बर्लिनमध्ये कोल्ह्याने चोरले शंभर बूट!

बर्लिन ः

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये अनेक लोकांचे बूट गायब होत होते. ही चोरी कोण करते याचा पत्ता लागत नव्हता. अखेर एका सीसीटीव्ही कॅमेर्‍याने चोराला ‘रंगे हाथ’ नव्हे ‘रंगे पंजे’ पकडले! हा चोर म्हणजे एक कोल्हा होता. या कोल्ह्याने आतापर्यंत शंभर बूट चोरल्याचे दिसून आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा कोल्हा तोंडात बूट घेऊन जात असताना दिसून आला. अनेक लोकांच्या घराच्या पोर्चमधून हा कोल्हा असे बूट लंपास करीत असे. हा कोल्हा कुठे जातो याचा तपास करण्यात आला व त्याच्या ‘अड्ड्या’वर अशी शंभर पादत्राणे दिसून आली. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे अनेक चप्पल, स्लीपर, बूट आणि सँडल्स होते. एका यूजरने या कोल्ह्याचा आणि त्याने लंपास केलेल्या बुटांचा व्हिडीओ टि्वटरवर शेअर केला आहे. हा कोल्हा बूट का चोरत होता हे समजू शकलेले नाही. मात्र, अशी ही पहिलीच घटना आहे असे नाही. शहरात वावरणार्‍या कोल्ह्यांकडून असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न शहरातही एका कोल्ह्याने अशाच प्रकार बूट चोरी केली होती.

Back to top button