चीन आता शुक्र मोहिमेच्या तयारीत | पुढारी

चीन आता शुक्र मोहिमेच्या तयारीत

बीजिंग : चीन सध्या अंतराळ क्षेत्रातही महाशक्‍ती बनण्याच्या प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांच्या माध्यमातून चीनचा रोव्हर मंगळावर यशस्वीपणे फिरत आहे. या देशाने चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात यश मिळवले. अशी कामगिरी करणारा चीन जगातील दुसरा देश बनला आहे. तसेच चंद्राच्या दुसर्‍या बाजूला यान पाठवणारा चीन हा पहिला देश आहे. मंगळ आणि चांद्र मोहिमेनंतर चीन आता शुक्र मोहिमेची तयारी करत आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर रशियाने अमेरिकेला आपल्या अवकाश मोहिमांतून बाहेर केले आहे. अशातच चीनने आपली नजर सूर्यमालेतील दुसर्‍या ग्रहांकडे वळविली आहे. यामध्ये शुक्राचा समावेश आहे. चीनच्या एका अंतराळ क्षेत्र संबंधित अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार चीन मंगळ व चंद्राच्या यशस्वी मोहिमानंतर आता दुसर्‍या ग्रहांवरही मोहिमा पाठविण्याचा विचार करत आहे. चीनने आपले पहिले आंतरग्रहीय मिशन तियानवेन-1 ला 2021 मध्ये प्रक्षेपित केले होते. मात्र, हे मिशन केवळ शुक्रासाठी नसून अन्य ग्रहांसाठीही ठरू शकते.

दरम्यान, चीनचे लुनार एक्सप्लोरेशन प्रोग्रॅमचे प्रमुख डिझाईनर वू वियरेन यांनी महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की तियानवेन 1, 2, 3 आणि 4 मिशन आता मंगळ मोहिमेनंतर अन्य मोहिमांसाठी तयार होत आहेत. मात्र, त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली नाही.

संबंधित बातम्या
Back to top button