कोल्हापूर : पुण्यात घ्या आपल्या मनातलं घर

कोल्हापूर : पुण्यात घ्या आपल्या मनातलं घर
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर ग्राहक विविध क्षेत्रांत गुंतवणुकीची संधी शोधत आहेत. दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित 'पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022' च्या निमित्ताने कोल्हापूरकरांना पुण्यामधील आपल्या मनातील घर घेण्याची संधी मिळणार आहे, असा विश्वास दै. 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी व्यक्त केला. हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसुदन हॉलमध्ये आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. जाधव व कोल्हापूर क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जाधव बोलत होते.

प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. आयकॉन स्टील हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

डॉ. जाधव म्हणाले, कोरोना काळात लोकांना बाहेर पडण्याची व गुंतवणूक करण्याची कोणतीच संधी नव्हती. कोरोनाचे निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे दै. पुढारी'ने कोल्हापूरकरांसाठी पुण्यात फ्लॅट घेण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी पुण्यात दै.'पुढारी'च्या वतीने आयोजित 'मिसळ महोत्सव' तसेच गडहिंग्लज येथील महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रॉपर्टी एक्स्पोदेखील ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.

क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणार्‍या पुणे नगरीमध्ये स्वत:चा फ्लॅट असावा, असे अनेकांचे स्वप्न असते. पण पुण्यात नेमके कुठे व कोणती प्रॉपर्टी खरेदी करायची, दर काय असणार या सर्वांची एकत्रित माहिती दै. 'पुढारी'ने आयोजित केलेल्या 'पुणे प्रॉपर्टी एक्स्पो'मुळे कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोल्हापुरातून पुण्यामधील आपल्या मनातील घर घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून कोल्हापूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे. यावेळी प्रकाश सुरोशे, सूरज तरटे, अरुण कांबळे, प्रकाश पाटील, जयेश ओसवाल, ताहीर रुमानी, तन्मय भावसार आदी उपस्िथत होते.

ग्राहक आता मोठ्या संख्येने घर खरेदीसाठी बाहेर पडायला लागले आहेत. रिअल इस्टेटसाठी ही चांगली बाब आहे. दै. 'पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो'ला याचा चांगला फायदा होईल. कारण या आधीच्या एक्स्पोमध्येही आम्ही सहभागी झालो होतो. त्यावेळीही अनेक लोकांनी आमच्या स्टॉलवर येऊन चौकशी केली होती. त्या अनेकांनी आमच्या प्रकल्पात घर खरेदीही केली होती. त्यामुळे घर खरेदीदारांचा हा सकारात्मक प्रतिसाद यावर्षीच्या 'पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022' मध्ये कायम आहे.
– विजय रायकर, अध्यक्ष, सुमेरू ग्रुप

गुढीपाडव्याच्या निमित्ताने 100 टक्के लोक घर खरेदीसाठी बाहेर पडतील. कारण सध्या बाजारपेठेत पैसा खेळता आहे. गेल्या दोन वर्षांत निर्माण झालेले कोरोनाचे सावट आता दूर झाले आहे. परिणामी लोकांचा द़ृष्टिकोनही बदलला आहे. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला नक्कीच होईल आणि या क्षेत्राच्या विकासाच्या वाढीची कवाडे पुन्हा एकदा खुली होती.
– दिनेश राठोड, व्यवस्थापकीय संचालक, जयवंत ग्रुप

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांचा घर खरेदीकडे कल वाढत आहे. दै. 'पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो'चा याला नक्कीच फायदा होईल. या आधीच्या प्रदर्शनातून ग्राहकांचा लाभ झाला आहे. त्यामुळे यावेळच्या प्रदर्शनालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी

रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढही सकारात्मक दिसत आहे. सरकारने या या क्षेत्रासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने व्याज दर कपातीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक आता सरसावले आहेत. दै. 'पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो'मधून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– गिरीश झिंगाडे, बिझनेस डेव्हलपमेंट हेड, कोलते पाटील डेव्हलपर्स

कोव्हिडच्या काळात लोकांचा पैसे साठवण्याकडे कल अधिक होता. त्यात वर्क फ्रॉम होम जीवनशैलीमुळे लोकांना घरांचे महत्त्व कळू लागले आहे. परिणामी आता ते देखील नवे घर खरेदीसाठी तयार झाले आहेत. दुसरीकडे, येत्या एक एप्रिलपासून स्टॅम्प ड्युटीत बदल होत आहे. त्याचा परिणाम बजेट होम्सवर होण्याची शक्यता आहे. पण सर्वसाधारण रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक वाढीचे संकेत आहेत.
– पूजा भागवत, जनरल मॅनेजर, मार्केटिंग, रोहन कन्स्ट्रक्शन

सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील घर खरेदीसाठी वातावरण अत्यंत चांगले आहे. ग्राहकही दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. त्या अनुषंगाने दै. 'पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022'तून चांगला फायदा होईल.
– प्रिया पवार, अध्यक्ष, स्टार प्रॉपर्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news