हेलिकॉप्टर खेचून घेणारी हिर्‍यांची खाण | पुढारी

हेलिकॉप्टर खेचून घेणारी हिर्‍यांची खाण

मॉस्को : युक्रेनवर हल्ला करणार्‍या रशियामधील एका गावात एक गूढ व रहस्यमयी हिर्‍यांची खाण आहे. सैबेरियन प्रांतात असलेल्या या खाणीतून कधीकाळी मोठ्या प्रमाणात हिरे सापडत होते. मात्र, आता हिरे मिळणे बंद झाले आणि ही खाण सध्या दुसर्‍या वस्तू गिळू लागली आहे. मिर मिने असे या रहस्यमयी खाणीचे नाव.

हे कसे कसे शक्य आहे, असा प्रश्न पडला तरी हे सत्य आहे. या खाणीच्या हजार फूट उंचीपर्यंत कोणतीही वस्तू असली तरी ही खाण त्या वस्तूला आपल्यात खेचून घेते. अशी ही रहस्यमयी खाण सैबेरियातील मर्नी नामक गावात आहे. ती सुमारे 1722 फूट खोल असून व्यास 3900 फूट इतका आहे. उल्लेखनीय म्हणजे आर्क्टिक सर्कलपासून ही खाण अवघ्या 280 मैल अंतरावर आहे. हिर्‍यांच्या खाणीचा हा खड्डा जगभरातील सर्वात मोठ्या खड्ड्यांपैकी एक आहे. कधी काळी यातून मौल्यवान हिरे मिळत होते. एलरोसा डायमंड कंपनी या खाणीतून हिरे काढण्याचे काम करत होते. त्यावेळी शेकडो कामगार या खाणीत काम करत असत.

1957 मध्ये स्टॅलिन यांनी या खाणीत पुन्हा खोदाई करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रचंड थंडीमुळे यामध्ये अनेक समस्या येत होते. मात्र, 1960 पासून पुन्हा हिरे सापडण्यास सुरुवात झाली. पहिल्या 10 वर्षांत खाणीतून दरवर्षी एक कोटी कॅरेटचे हिरे सापडले. यामध्ये 342.57 कॅरेटचा लेमन यलो डायमंडचाही समावेश होता. डि बीअर नामक कंपनीने या खाणीतून अब्जावधी रूपयांचे हिरे काढले. मात्र, 2004 मध्ये मोठा महापूर आल्याने खाण बंद करावी लागली. या खाणीच्या हजार फूट उंच आकाशात एकादी वस्तू असेल ती या खाणीत खेचली जाते. थंड व उष्ण हवा यांचे मिश्रण झाल्याने शक्तीशाली आकर्षण निर्माण होत. यामुळे वस्तू वेगाने खेचली जाते.

सध्या या भागातील एअरबेसही बंद करण्यात आले आहे. ही खाण 2009 मध्ये सुरु करण्यात आली. मात्र, 2017 मध्ये पुन्हा पूर आल्याने खाण बंद करण्यात आली. मात्र, पुरादरम्यान खाणीत अडकल्याने शेकडो कर्मचार्‍यांचा प्राण गेला.

Back to top button