नवी दिल्‍ली : अजब संतुलन साधलेल्या शिळा!

नवी दिल्‍ली : जगभरात काही मोठ्या शिळा अशा आहेत ज्यांनी उतारावरही अफलातून संतुलन साधलेले आहे. जणू काही गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला वाकुल्या दाखवतच शेकडो वर्षांपासून या शिळा स्थिर राहिलेल्या आहेत.


म्यानमारमध्ये अशीच एक शिळा आहे. तिला सोनेरी रंग देण्यात आलेला असल्याने ‘गोल्डन रॉक’ असेही म्हटले जाते. 2500 वर्षांपासून ही शिळा अशी उतारावर संतुलन साधून उभी आहे. याठिकाणी एक सुंदर बौद्ध मठही आहे. भारतात दक्षिणेतील महाबलीपूरम या ऐतिहासिक शहरातही अशीच एक शिळा आहे.

या गोलाकार दगडाचा आकार जणू काही लोण्याच्या गोळ्यासारखाच दिसत असल्याने त्याला ‘कृष्णाच्या लोण्याचा गोळा’ असेही म्हटले जाते. हा दगड सुमारे 5 मीटर व्यासाचा आणि 250 टन वजनाचा आहे. एका तिरप्या भागावर तो 45 अंशाच्या कोनात उभा आहे. हा दगड खाली ढकलण्याचा पूर्वी अनेकांनी प्रयत्न करून पाहिला होता, पण तो हलला नाही असे

हेही वाचा : 

Exit mobile version