काेराेना : रुग्‍ण बरे होण्‍याची टक्‍केवारी ९७.२२ | पुढारी

काेराेना : रुग्‍ण बरे होण्‍याची टक्‍केवारी ९७.२२

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोना रुग्‍ण बरे होण्‍याची टक्‍केवारी ९७.२२ इतकी झाली आहे. कोरोना रुग्‍ण बरे होण्‍याची टक्‍केवारी वाढल्‍याने आराेग्‍य विभागाला दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा 

मागील २४ तासांमध्‍ये ३७ हजार १५४ नवे रुग्‍ण आढळले.

देशात सध्‍या ४ लाख ५० हजार ८९९ सक्रीय रुग्‍ण आहेत. ३९ हजार ६४९ जण कोरानावर मात केली. ७२२ जणांचा मृत्‍यू झाला आहे, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

देशात आतापर्यंत ३ कोटी ८ लाख ७४ लाख ३७६ जण कोरोनाबाधित झाले होते. ३ कोटी १४ हजार ७१३ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. ४ लाख ८ हजार ७६४ जणांचा मृत्‍यू झाला आहे.

अधिक वाचा 

सक्रीय रुग्‍णसंख्‍या ही १.४६ टक्‍के इतकी आहे. तर दैनंदिन संसर्ग दर हा २.५९ टक्‍के इतका आहे.

आतापर्यंत ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ जणांचे लसीकरण झाले आहे. मागील २४ तासांमध्‍ये १२ लाख ३५ हजार २८७ जणांचे लसीकरण झाले.

अधिक वाचा 

देशात आता कोरोनाच्‍या दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवस रुग्‍णवाढ आणि मृत्‍यूसंख्‍येमध्‍ये चढ-उतार कायम राहिला. रविवारी ४१ हजार ५०६ नवे रुग्‍ण आढळले होते. तर ८९५ जणांचा मृत्‍यू झाला होता.

रुग्‍णसंख्‍या कमी होत असल्‍याने अनेक राज्‍यांमध्‍ये अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळा, कॉलेज, दुकाने, बाजारपेठा आणि रेस्‍टारंट खुली करण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे.

सक्रीय रुग्‍णसंख्‍या ही १.४६ टक्‍के इतकी आहे. तर दैनंदिन संसर्ग दर हा २.५९ टक्‍के इतका आहे.

दुसरी लाट ओसरत असताना आता तिसर्‍या लाटेची टांगती तलवार आहे.

हेही वाचलं का?

पुढील तीन महिन्यांत निर्देशांक वाढीचे संकेत

पीएफचे अर्थगणित

गृहकर्ज जोडा बचत खात्याशी

पहा व्‍हिडिओ : सगळी लक्षणे दिसूनही काेराेनाची टेस्‍ट निगेटिव्‍ह का येते ? 

 

Back to top button