नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल ४९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ३० आणि १९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यात १४, कानपूर देहातमध्ये पाच, तर कौशंबीमध्ये चार जण दगावले आहेत. फिरोझाबादमध्ये तीन तर उन्नाव, चित्रकूटमध्ये दोन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
अधिक वाचा
उत्तर प्रदेश सरकारने वीज कोसळून झालेल्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुंटुबियांना मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर पीडितांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहे. गाझीपूर, फिरोझाबाद, बलियामध्ये या ठिकाणीही जोरदार पाऊस होऊन काही जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
अधिक वाचा :
राजस्थान राज्यातही वीज कोसळून १९ लोकांचा जीव गेला आहे. यामध्ये सर्वाधिक जयपूर जिल्ह्यात ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर विविध ठिकाणी वीज कोसळून १५ च्यावर लोक जखमी झाले आहेत. राजस्थानमध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रविवारी अचानक पावसाचे आगमन झाल्याने काही ठिकाणी नाले तुंडूंब भरून वाहत आहेत.
राजस्थान आपत्ती व्यवस्थान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अंबर किल्ल्याजवळ काल (दि. १२) मोठ्या प्रमाणात वीज कोसळ्याच्या घटना घडल्या. यात ११ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांसह, स्थानिक पोलिसांनी तातडीने नागरिकांना मदत करत बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक वाचा :
राजस्थानमधील जहालवार येथील लालगौन येथे शेळ्या चरायला नेणाऱ्या एका २३ वर्षीय मुलावरही वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेतही शेळ्या चरायला नेणाऱ्या कोट्टा परिसरातील चार मुलांचाही वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तसेच ढोलपूरमधील बारी परिसरातही तीन मुलांचा वीजपडून मृत्यू झाला.
राजस्थानमध्ये विविध ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
याचबरोबर जखमींना तातडीने मदत करण्याचीही ग्वाही मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
विहीर नव्हे हा तर राजवाडाच !