हिंगोली : औंढा नागनाथ येथे ओढ्याच्या पाण्यात आई, मुलगा गेले वाहून! | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ येथे ओढ्याच्या पाण्यात आई, मुलगा गेले वाहून!

[visual_portfolio id=”5676″] हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडसी (असोला) येथे ओढ्याच्या पाण्यात आई, मुलगा वाहून गेले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडसी (असोला) येथे ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला आला नाही. यामुळे गाडी ओढ्याच्या पाण्यात गेली. यामुळे आई व मुलगा पाण्यात वाहून गेली. रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

अधिक वाचा : 

औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा) येथे रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही.

अधिक वाचा : 

या दरम्यान वर्षा पडोळ आणि श्रेयस पडोळ हा सात वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके, चालक योगेश यातून बाहेर आले.

अधिक वाचा :

दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे पाण्यात वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत. रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते. या घटनेने औंढा नागनाथ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा

Back to top button