गेल्या आठवड्यातील केंद्रीय मंत्री मंडळातील बदलमुळे मुंबई शेअरबाजारावर म्हणावा तितका बदल झाला नाही. निर्देशांक मध्ये सुमारे 500 व निफ्टीमध्ये सुमारे 150 अंकांची घट झाली. प्रमुख शेअर्स मात्र त्यामानाने वाढते किंवा घटले नाहीत. काही महत्त्वाच्या शेअर्सचे भाव गुरुवारी 8 तारखेला बाजार बंद होताना पुढीलप्रमाणे होते.
हेग 2226 रुपये, ओएनजीसी 117 रु. जिंदाल स्टेनलेस हिस्सार 207 रु., मन्नापुरम 174 रु., बजाज फायनान्स 6117 रु. फिलीप कार्बन 240 रु, इंडियन ऑईल कंपनी 107 रु., अशोका बिल्डकॉन 110 रु., जे कुमार इन्फ्रा 194 रु., रेप्को होम्स 365 रु., जिंदाल स्टील 386 रु., मुथुट फायनान्स 1533रु., केइआय इंडस्ट्रीज 730 रु., लार्सेन अँड टूब्रो 1500 रु., हार्सेन अँड टूब्रो इन्फोटेक 4042 रु., भारत पेट्रोलियम 458 रु., इंडिया बुल्स हाऊसिंग 261 रु., हिंदुस्थान पेट्रोलियम 281 रु., ग्राफाईट 636 रु., स्टेट बँक 424 रु., स्टील स्ट्रीप्स 1009 रु., पीएनबी हाऊसिंग 721 रु., बजाज फिनसर्व्ह 12333 रु., पिरामल एंटरप्राइझेज 2320 रु.,
बाजारात सध्या उत्साहवर्धकच बातम्या येत आहेत. त्यातून पुढील 3 महिन्यात जर पावसाळा चांगला झाला, तर निर्देशांक आणखी 400-500 अंकांनी वाढू शकतो.
आणखी काही आठवड्यांनी जूनअखेर संपलेल्या कंपन्यांच्या पहिल्या सहामाहीच्या विक्री व नक्त नफ्याचे आकडे येतील व त्यावर बाजारातील चढउतार अवलंबून राहील. सध्या बँकांतील मुदत ठेवीचे, ठेवीदारांकडून काही सूचना आल्या नाहीत तर आपोआप नूतनीकरण होते. ही पद्धत बँका कदाचित यापुढे बंद करतील.
गेले 8 महिने आर्थिक पातळीवर केंद्र सरकारला दिलासा देणारे वस्तू आणि सेवा करावे उत्पन्न जून महिन्यात घटले असून ते 1 लाख कोटी रुपयांच्या आत झाले आहे. अनेक राज्यांतील लॉकडाऊन संपताच आर्थिक घडामोडीमध्ये वाढ झाली. त्यामुळेच जूनमध्ये 5.5 कोटी ई-वे-बिलांची निर्मिती झाली. त्यातून उद्योगधंदे पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्ट झाले. 20 जूनपासून ई-वे-बिलात रोज 20 लाख बिलांची निर्मिती झाली आहे.
कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्यांनी मिळून करावयाच्या व्यवस्थेसाठी 23 हजार 123 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे ठरवले आहे. ही रक्कम जुलै ते मार्च 2022 या पुढील 9 महिन्यांत वापरायची आहे. या पॅकेजमध्ये केंद्राचा हिस्सा 15 हजार कोटी रुपयांचा असेल, तर उरलेली 8000 कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारे खर्च करतील.
याच मुदतीने फेब्रुवारी 2022 च्या 1 लाख आठवड्यात केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जाईल. या पैकी बरीच रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च केली जाणार आहे. या कार्यक्रमात 50 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची योजना आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताने कोरोना संकटाचा मुकाबला स्पृहणीयरीत्या केला आहे.
टाटा कन्सलन्सी सर्व्हिसेसचा वक्त नफा जून 2021 ला संपलेल्या 9010 कोटी रुपये झाला आहे. एप्रिल ते जून 2021 या 1 ल्या तिमाहीत कंपनीचा एकूण व्यवहार 45000 कोटी रुपयांवर गेला आहे.
या कंपनीने ते मार्च 2021 तिमाहीत नोकर भरतीचा विक्रम केला. जून 2021 तिमाहीत कर्मचार्यांची संख्या वाढून 5 लाखांवर गेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे या तिमाहीचे आकडे जेव्हा जाहीर होतील, तेव्हा तेही ठसठशीतच दिसतील.
डॉ. वसंत पटवर्धन