१२ वर्षांवरील मुलांना लवकरच कोरोना प्रतिबंधक लस | पुढारी

१२ वर्षांवरील मुलांना लवकरच कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षांवरील मुलांना लवकरच देण्‍यात येणार आहे.गर्भवती महिलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्‍यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा 

देशात सर्वप्रथम १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाईल.

लस देण्‍यासंदर्भातील विशेष कार्यसमितीच्‍या शिफारशींची केंद्र सरकारला प्रतीक्षा आहे.

आपत्तकालीन काळात लस देण्‍यासंदर्भातील निर्णयानंतर मुलांना लस देण्‍याचा निर्णय होवू शकतो. अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी दिली.

vaccination 1

अधिक वाचा 

देशातील लस उत्‍पादक कंपनी झायडस कॅडिलाने १२ वर्षांवरील मुलांसाठीच्‍या लसची चाचणी घेतली आहे. या लसीला परवानगी मिळाल्‍यानंतर १२ वर्षांवरील मुलांसह प्रोढांनाही ही लस देण्‍यात येणार आहे.

अधिक वाचा 

पहिला टप्‍पा लवकरच सुरु होण्‍याची शक्‍यता आहे. सप्‍टेंबर महिन्‍यात लसीचा दुसरा टप्‍पा सुरु करण्‍याचे नियोजन असल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

२ वर्षांवरील मुलांनाही मिळणार लस
सध्‍या २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना देण्‍यात येणार्‍या लसीबाबत कोवाक्‍सिनचे परीक्षण सुरु आहे.त्‍यामुळे सप्‍टेंबर महिन्‍यानंतर १२ वर्षांपेक्षा कमी मुलांनाही लस देण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे.मुलांना लस देण्‍यासाठी आरोग्‍य मंत्रालयाच्‍या लसीकरण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

vaccination 2

१८ वर्षांपेक्षा कमी लोकसंख्‍या ३२ कोटींहून अधिक

आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, देशात १८ वर्षांवरील लोकसंख्‍या ९४ कोटींहून अधिक आहे. तर १८ वर्षांपेक्षा कमी लोकसंख्‍या ही ३२ कोटींहून अधिक आहे.देशात मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम राबवले जातात. आरोग्‍य विभागाला याचा मोठा अनुभवही आहे. त्‍याचप्रमाणे मुलांसाठीही लस देण्‍याचा कार्यक्रम राबविण्‍याचे नियोजन आहे.

‘झायडस कॅडिला’ने सुरु केले लसीचे उत्‍पादन

लस उत्‍पादक कंपनी झायडस कॅडिलाने लसचे उत्‍पादन सुरु केले आहे.आपत्तकालीन वापरासाठी अद्‍याप कंपनीला परवानगी मिळालेली नाही.तीन महिन्‍यात चार कोटी लस उत्‍पादनाची क्षमता असल्‍याचे कंपनीने सरकारला कळविले आहे.

ही क्षमता पूर्ण करण्‍यासाठी कंपनीने आतापासूनच लस उत्‍पादन सुरु केले आहे.

ऑगस्‍ट महिन्‍यापर्यंत लसीचे एक कोटी डोस उपलब्‍ध करण्‍यासाठी कंपनी प्रयत्‍न करीत आहे.

केंद्राने राज्‍यांना दिले ११ लाख डोस

महाराष्‍ट्र, दिल्‍ली, राजस्‍थान आणि गुजरातसह अनेक राज्‍यांमध्‍ये लसीचा तुटवडा आहे.रविवारी राज्‍यांना ११ लाख डोसदेण्‍यात आले. तर आतापर्यंत ३७ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

सर्वच राज्‍यांमध्‍ये लसीकरणाचा गती खूपच संथ आहे. केवळ २१ जून रोजी एकाच दिवशी ८६ लाख डोस देण्‍यात आले होते.

मागील सात दिवसांमध्‍ये प्रतिदिनी ३९ लाख डोस देण्‍यात आले आहेत. यापूर्वीच्‍या आठवड्यांमध्‍ये ही संख्‍या ४१ लाख इतकी होती.तर २१ जूनच्‍या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ६४ लाख डोस देण्‍यात आले.याच आकडेवारीवरुन लसीकरणाचा वेग मंदावल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

हेही वाचलं का? 

गृहकर्ज जोडा बचत खात्याशी

पुढील तीन महिन्यांत निर्देशांक वाढीचे संकेत

पीएफचे अर्थगणित

व्‍हिडिओ पहा : कोरोना उपचाराचा खर्च : मेडिक्‍लेमचे हे आहेत पर्याय

 

 

Back to top button