पुणे : कुख्यात गुंड पप्पू वाडेकरचा दगडाने ठेचून खून; नेमकं काय घडलं? | पुढारी

पुणे : कुख्यात गुंड पप्पू वाडेकरचा दगडाने ठेचून खून; नेमकं काय घडलं?

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा खून करण्यात आला आहे. कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याने पुणे शहरात दहशत माजवली होती. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमधील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा राग होता. या रागातून कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढला. असा अंदाज पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा :

विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८) याचा खून करण्यात आला. गुंड पप्पू वाडेकर याच्या खुनाची घटना रविवारी (दि११) रात्री बाराच्या सुमारास घडली.

हल्लेखोरांनी त्याला पिस्तूलातून गोळी झाडून खल्लास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फायरिंग चुकवून पप्पू वाडेकर पळाला. पण त्याला गाठून दगडाने ठेचून मारण्यात आले.

येथील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून पाच ते सहा जणांनी पप्पूचा काटा काढला. असा अंदाज पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे. पप्पू वाडेकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अधिक वाचा : 

तडीपार करूनही मुलीला भेटायला आला

टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते. रविवारी (दि ११) रात्री तो आपल्या लहान मुलीला भेटायला राजगुरूनगर परिसरात आला होता.

संशयित आरोपी व त्याच्यात पूर्वी दोनदा जोरदार भांडणे झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात समेट सुद्धा झाल्याची चर्चा आहे.

रविवारी रात्री वाडेकर एका हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकीने पाबळ रस्त्याने जात होता. लघुशंकेसाठी कडेला गाडी लावून थांबला असता पाळत ठेवलेल्या आरोपींनी त्याला गाठले. सुरुवातीला पिस्तुलातून फायरिंग केले. वाडेकरने तो चुकवीत आडोशाला पळ काढला. त्याला गाठून त्याच्या डोक्यात दगड घातला आणि यात तो जागीच ठार झाला.

अधिक वाचा : 

या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे. गेले काही काळ शांतता असलेल्या शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.

या खुनानंतर टोळीयुद्ध भडकण्याची लोकांमध्ये भीती आहे. पोलीस निरीक्षक गुरव अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button