औरंगाबाद : चनकवाडी येथे हिटरचा शॉक लागून एकाचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : चनकवाडी येथे हिटरचा शॉक लागून एकाचा मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील एका ४४ वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. दशरथ आसाराम धरम (रा. चनकवाडी ता.पैठण ) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चनकवाडी येथील दशरथ आसाराम धरम (वय ४४) हा तरुण आपल्या घरी सकाळी अंघोळीसाठी पाणी घेत असताना त्याला हिटरचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे बीट जमादार लक्ष्मण पुरी, पोकॉ एस. एस भागिले, एस. व्ही. खिळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button