छत्रपती संभाजीनगरच्या अर्हतने पटकावली अमेरिकेची दीड कोटींची स्कॉलरशीप

छत्रपती संभाजीनगरच्या अर्हतने पटकावली अमेरिकेची दीड कोटींची स्कॉलरशीप

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पेठेनगर येथील अर्हत धाबे या विद्यार्थ्यास अमेरिकेतील लाग्रांज कॉलेजकडून बी. एस. या पदवी अभ्यासक्रमासाठी 'प्रेसिडेंट्स स्कॉलरशिप' मिळाली आहे. या स्कॉलरशीपची एकूण रक्कम तब्बल 1 कोटी 610 लाख रुपये इतकी आहे. या शिष्यवृत्तीमध्ये त्याच्या पदवीचा संपूर्ण खर्च: शिक्षणशुल्क, निवास आणि भोजन शुल्काचा समावेश आहे.

पेठेनगर भागातील अर्हत धाबे हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात तर बारावी विज्ञानचे शिक्षण स्प्रींगडेल महाविद्यालयात झाले. जार्जिया येथील लाग्रांज कॉलेज हे 1831 साली स्थापन झालेले आहे. लाग्रांज महाविद्यालयाने विज्ञानावर आधारित उद्योजकता आणि व्यवसाय या विषयावर पाच आठवडयांची आंतरवासिता आणि परिसंवाद आयोजित केला होता. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला आहे. या ऑनलाईन उपक्रमात अर्हतने सहभागी झाला होता. यात अर्हतने 'प्रेसीडेंट्स स्कॉलरशिपचा बहूमान पटकावला आहे. या महाविद्यालयाची यंदाची स्कॉलरशीप मिळविणारी तो एकमेव विद्यार्थी आहे. त्याचे वडील डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

त्याचे वडील डॉ. अरविंद धाबे यांनी सांगितले की, जॉर्जिया येथील लाग्रांज कॉलेजने सहा महिन्यांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने उद्योजकता आणि व्यवसाय या विषयावर पाच आठवडयांची आंतरवासिता व परिसंवाद आयोजित केला होता. त्यासाठी अर्हतने नोंदणी केली होती. कॉलेजकडून त्याची ऑनलाईन मुलाखत झाली. त्यातून परिसंवादासाठी निवड झाली. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर त्याला ही स्कॉलरशिप मिळाली आहे. आता तो ऑगस्ट महिन्यात बी. एस. च्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news