सोलापूर विद्यापीठामध्ये शिकत आहेत ७४ वर्षांच्या आजीबाई | पुढारी

सोलापूर विद्यापीठामध्ये शिकत आहेत ७४ वर्षांच्या आजीबाई

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शिकायला अट नसते, त्यासाठी लागते ती जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा. याची प्रचिती सोलापूरच्या 74 वर्षे वयाच्या आजी विद्या काळे यांच्याकडे पाहून येते. कारण या वयातही त्यांनी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नाट्याशास्त्र विभागात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तब्बल 74 व्या वर्षीही त्यानीं नवे काही शिकण्याचा ध्यास घेतला आहे.

विद्या काळे यांनी 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिकेपासून मुख्याध्यापिका पदापर्यंत नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर पुढील काही वर्षांत आयुष्य मनासारखे जगल्या. मात्र त्यांच्यातील शिक्षेकाला नवे काही शिकण्याची उर्मी गप्प बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या नाटकाची आवड जोपासण्यासाठी विद्या काळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. प्रथम वर्ष यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता त्यांनी द्वितीय वर्षाची परीक्षा दिली आहे.

ज्या वयामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिसत नाही, वाचता येत नाही. त्या वयामध्ये विद्या काळे या नाट्यशास्त्राचे धडे गिरवत आहेत. आतापर्यंत त्यांनी एम. ए.बी एड, संगीत, नाट्य, क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळवले आहे.

लॉकडाऊनमध्ये विरंगुळा म्हणून शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. जेष्ठ नागरिकांनी स्वतःला एकटे ठेवू नये. कुठेतरी मन गुंतवून ठेवले पाहिजे.
– विद्या काळे

Back to top button