औरंगाबाद : कन्नड तालुक्यात विद्युत जोडणी करणाऱ्या चार जणांचा शॉक लागून मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात विद्युत जोडणी करणाऱ्या चार जणांचा शॉक लागून मृत्यू

कन्नड (औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : हिवरखेडा नांदगीरवाडी येथील शिवारात विद्युत तारांची जोडणी करताना शॉक लागून चार तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. नावडी येथील हे तरुण विद्युत खांब उभा करणे, त्यावर विद्युत तारा ओढून देणे असे विज पुरवठा संबधी कामे करत होते.

दरम्‍यान, कामे सुरू आसताना विद्युत पुरवठा सुरू होवून शॉक लागून जागीच मृत्‍यु झाला. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर. असे चौघे जण जागीच मृत्यूमुखी पडले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच खाजगी ठेकेदार की महावितरण यांचेकडून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button