Sanjay Raut Arrest Warrant : संजय राऊतांना अटक करण्याचा आदेश जारी, शिवडी कोर्टाचा निर्णय | पुढारी

Sanjay Raut Arrest Warrant : संजय राऊतांना अटक करण्याचा आदेश जारी, शिवडी कोर्टाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना शिवडी कोर्टाने मोठा झटका दिला आहे. राऊत यांच्या विरोधात कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केल्याची समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी शिवडी कोर्टाकडून हा निर्णय दिला आहे. (Sanjay Raut Arrest Warrant)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभार आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. यानंतर राऊत यांच्या आरोपांविरुद्ध मेधा सोमय्या यांनी कोर्टाचे दार ठोठावले. राऊत यांनी वारंवार आपल्यावर आरोप केले असून हे आरोप बिनबुडाचे आहेत अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना समन्स बजावला आणि कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. (Sanjay Raut Arrest Warrant)

खुद्द किरीट सोमय्या यांनीही राऊत यांना याप्रकरणी मोठा दणका बसेल असा इशारा दिला होता. अखेर आज (दि. ८) शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Sanjay Raut Arrest Warrant)

Back to top button