सोलापूर : तिर्‍हे ग्रामपंचायतीकडून कृषिदुतांचे स्वागत | पुढारी

सोलापूर : तिर्‍हे ग्रामपंचायतीकडून कृषिदुतांचे स्वागत

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील सर्वच चौथ्या वर्षातील कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांचा विद्यापीठ नियमांतर्गत असणारा रावे सुरू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत अभिजित काजळे, अभिजित ढवळे, अक्षय चोरमले, आदित्य जावळे, गणेश पिसे व सागर व्हनमाने हे कृषिदूत तिर्‍हे (ता.उत्तर सोलापूर) येथे आले असता ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

हे कृषिदूत गावातील शेतकर्‍यांना आधुनिक कृषीविषयक माहिती देणार आहेत. त्यामध्ये पिकावरील रोग, त्यांचे नियंत्रण फवारणी, जनावरांचे लसीकरण, शेती उत्पादनवाढीचे तंत्र, सिंचन सुविधा, शासकीय योजनांबाबत जनजागृती करणार आहेत. या कार्यक्रमासाठी तिर्‍हे गावचे सरपंच नेताजी सुरवसे, तिर्‍हे परिसर पशुवैद्यकीय अधिकारी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button