

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीतील प्रचारानिमित्त सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आव्हान-प्रति आव्हान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'एआयएमआयएम' नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी २०१३ मध्ये पोलिसांसदर्भात केलेल्या विधानावर भाजप नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रक्षोभक विधान केले. हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी ओवेंसींवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रचार सभेत बाेलताना नवनीत राणा म्हणाल्या की, दराबादचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे भाऊ म्हणाले होते की, 'पोलिसांना 15 मिनिटांसाठी काढून टाका म्हणजे आम्ही काय करू शकतो ते दाखवू', मला अकबरुद्दीनला सांगायचे आहे की, तुम्हाला 15 मिनिटांसाठी लागतील; परंतु आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील."
राणा पुढे म्हणाल्या की, जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही 15 सेकंदात करू जेणेकरुन लहान आणि मोठ्यांना ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही. खरे तर 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका वक्तव्यात म्हटले होते की, जर पोलिसांनी 15 मिनिटांसाठी माघार घेतली तर कोणात किती हिम्मत आहे हे आम्ही सांगावे.
'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. हैदराबाद मतदारसंघातून भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला उभे केले आहे. ओवेसी हे 2004 पासून हैदराबाद लाेकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले आहेत.
हेहीवाचा: