वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा शहरालगतच्या चितोड मार्गावर धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.
आज सकाळी साडेदहाच्या वाजणाच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. मृताचे नाव किसन गजानन देवतळे (वय-१८) असल्याचे सांगण्यात आले.
शहरालगतच्या चितोडा मार्गावर युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांची गर्दी झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत चौकशी सुरू केली.
मृत व्यक्तीच्या डोक्यावर आणि मानेवर वार केल्याचे दिसून आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार, पोलिस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, चन्नोर तसेच पोलिस अधिकारी, गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनास्थळापासून काही अंतरावर मृत किसनची एमएच ३२ एडी ७९८४ क्रमांकाची दुचाकी आढळली. पोलिसांनी चप्पल तसच इतर काही साहित्य घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे कविचेची चर्चा