सांगलीवाडी : महापुरातील १२ फुटी अजस्त्र मगर! | पुढारी

सांगलीवाडी : महापुरातील १२ फुटी अजस्त्र मगर!

सांगली, पुढारी वृत्तसेवा : महापुराने नदीपत्रालगत वास्तव्यास आलेली महाकाय १२ फुटी मगर वन विभागाने धाडसी युवकांच्या मदतीने बुधवारी दुपारी पकडली. ही १२ फूट लांबीची मगर कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीवाडी गावातील नागरी वस्तीत आली होती.

गावाचा बराच भाग पाण्याखाली होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली असताना बुधवारी सांगलीवाडीत सकाळी धरण रस्त्यावरील वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही मगर दिसली.

नागरीवस्तीत जात असलेल्या या मगरीला स्मशानभूमीकडे हुसकावून लावले आणि ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे अधिकारी आणि सांगलीवाडी येथील नागरिकांच्या मदतीने ही मगर पकडण्यात दुपारी यश आले.

मगर पाहण्यासाठी सांगलीवाडी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. नेहमी या परिसरात आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला नदी पत्रात या मगरीचा वावर दिसून येतो. मात्र, त्यावेळी शोध घेऊनही मगर सापडली नाही. आता स्मशानभूमी परिसरात हे मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक दिवसांपासून नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून महापुरामुळे कोणकोणत्या नागरी वस्तीत आल्या आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे. डिग्रज येथे छतावर अडकून पडलेली मगर आजूबाजूच्या गावात मगरीच्या जाणवू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण असून वन विभागाने काही काळ सर्व गावात पथके तैनात करण्याची मागणी होत आहे.

चिखल आणि वाहून आलेला कचरा यातून अनेक प्रकारचे साप ही आढळत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुलगी झाली हो : सर्वांच्या तोंडी एकचं नाव माऊ, दिव्या सुभाषविषयी जाणून घ्या बरचं काही

मुलगी झाली हो : सर्वांच्या तोंडी एकचं नाव माऊ, दिव्या सुभाषविषयी जाणून घ्या बरचं काही

 

Back to top button