जयंत पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल; अचानक अस्वस्थ वाटू लागले  | पुढारी

जयंत पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल; अचानक अस्वस्थ वाटू लागले 

इस्लामपूर पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना बुधवारी दुपारी ब्रिज कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत दुपारी मंत्री मंडळातील नेत्यांची बैठक होती.

राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

त्यामुळे ते या बैठकीतून बाहेर पडले. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यांचे रुटीन चेकअप करण्यात येत असल्याचे समजते.

त्यांच्या आज वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये काही चाचण्या करण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंत्री जयंत पाटील यांची तब्बेत ठीक असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

जयंत पाटील यांनी ठिक असल्याची माहिती ट्विटवर वरुन दिली.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद! अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घेऊया मुंबईतल्या मूर्तिकारांची व्यथा

Back to top button