उच्चांकी पाऊस : चांदोलीत ५० दिवसांचा पाऊस बरसला केवळ ७ दिवसात! | पुढारी

उच्चांकी पाऊस : चांदोलीत ५० दिवसांचा पाऊस बरसला केवळ ७ दिवसात!

वारणावती; आष्पाक आत्तार : चांदोली धरण परिसरात यंदा प्रथमच 23 जुलै रोजी 24 तासात 574 मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस पडला आहे.

चांदोलीच्या इतिहासात या उच्चांकी रेकॉर्ड ब्रेक पावसाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.

तर धरणाची पाणी पातळी ही 24 तासात साडेचार टीएमसी ने वाढण्याची ही पहिलीच घटना आहे. तर दुसरीकडे 50 दिवसात बरसलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस सात दिवसात चांदोली परिसरात बरसला आहे.

अधिक वाचा :

चांदोली धरणाचे तांत्रिक वर्ष एक जून पासून सुरू होते. एक जून पासून 20 जुलै अखेर 50 दिवसात चांदोलीत 765 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 21 जुलै ते 27 जुलै अखेर सात दिवसात तब्बल 1 हजार 285 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. पन्नास दिवसात पडलेल्या पावसाच्या जवळपास डबल पाऊस सात दिवसात चांदोलीत पडला आहे.

यंदा एक जून रोजी चांदोली धरणामध्ये 14. 45 टीएमसी पाणी साठा होता. धरणाची पाणी पातळी 602 . 50 मीटर इतकी होती. 22 जुलै रोजी 52 दिवसात 1 हजार 18 मिलिमीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात पडला. या पावसाने धरणाची पाणी पातळी 17 .75 मीटरने वाढून पाणीसाठा 13 . 67 टीएमसी ने वाढला.

पुढे 23 जुलै रोजी 24 तासातच तब्बल 574 मिलिमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 24 तासातच तब्बल सव्वा पाच मीटरने तर पाणीसाठा साडेचार टीएमसी ने वाढला.

यंदा एक जून रोजी धरणात 14.45 टीएमसी म्हणजेच 42 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत 2.62 टीएमसी हा पाणीसाठा अधिक होता. सुरुवातीला पावसाची गती ही धिमी होती.

एक जून पासून 20 जुलै अखेर 50 दिवसात केवळ 765 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 21 जुलैपासून मात्र पावसाने गती घेतली. सलग पाच दिवस अतिवृष्टीची नोंद झाली.

त्यामुळे या पाच दिवसातच धरणात जवळपास 70 हजार कयुसेक्स पाण्याची आवक होवू लागली त्यामुळे विसर्गही यंदा 28 ते 30 हजार क्युसेक्स पर्यंत करावा लागला.

परिणामी वारणा नदी पात्राबाहेर जाऊन नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला. 21 जुलै पर्यंत पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाणीसाठा पाहता धरण व्यवस्थापनाचे नियोजन योग्य वाटत होते.

मात्र पुढील पाच दिवसात झालेल्या पावसामुळे धरणाची झपाट्याने वाढलेली पाणी पातळी आणि मोठ्या प्रमाणात करावा लागलेला विसर्ग यामुळे व्यवस्थापन चुकले की काय असा प्रश्न निर्माण झाला. तरीही 70000 कयुसेक्स आवक असताना पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन कमीत कमी विसर्ग करण्याचा धरण व्यवस्थापनाने प्रयत्न केला.

पुढे पावसानेही साथ दिल्यामुळे पूर परिस्थिती लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली.

धरणातील सुरवातीचा साठा पावसाचे प्रमाण ,अचानक पडणारा पाऊस आणि यंदाचा महापुर या बाबी विचारात घेवून धरण वेवस्थपनाने भविष्यात नियोजन करण्याची गरज आहे.

अधिक वाचा :

Back to top button