अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या कवितेची चर्चा; बेरंग, बेचव आयुष्याला कलाटणी | पुढारी

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या कवितेची चर्चा; बेरंग, बेचव आयुष्याला कलाटणी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनयासोबतचं आता कवयित्रीही झाली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या एका खास कवितेमुळे तिची जोरदार चर्चा होतेय. पण, तिने ही कविता कुणासाठी आणि का लिहिली? याबाबत वाचा ही माहिती.

अधिक वाचा- 

प्राजक्ता माळी दिसायला सुंदर आहे. ती उत्तम अभिनयही करते. ती एक चांगली सूत्रसंचालन करते तसेच नृत्यांगनाही आहे. इतकेचं नव्हे तर ती उत्तम कवयित्रीही आहे. कारण, तिने पहिल्यांदाच तिची स्वरचित एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अधिक वाचा –

तिने स्वतःचा काव्यसंग्रह ‘प्राजक्तप्रभा’ची निर्मिती केली आहे. तिची वैचारिक कविता खरोखरंच विचार करायला भाग पाडणारी आहे.
तिच्या या खास कवितेमुळे तिची जोरदार चर्चा होतेय. सोशल मीडियावर तिची कविचा चर्चेचा विषय बनला आहे.

अधिक वाचा- 

प्राजक्ता नेहमीचं सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध पोषाखात फोटोशूट करते.

पूर्वीपेक्षा प्राजक्ता खूप सुंदरही दिसत आहे. ती अनेकदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे करते. कधीकधी हटके पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती.

काही वर्षापूर्वी तिने युरोप दौरा केला होता. युरोप ट्रीपमध्ये एका तरुणासोबतचे फोटोज तिने शेअर केले होते. त्यानंतर तिचा मित्र की बॉयफ्रेंड, असा तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली होती.

आता तिने कविता लिहिल्याने ही कविता नेमकी कुणासाठी लिहिली आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही कविता लिहिली आहे. तिच्या या कवितेला नेटकऱ्यांकडून भरभरून कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

prajakta mali
प्राजक्ता माळी

बेरंग, बेचव आयुष्याला ‘कलाटणी’ देऊन जाते..

कला

‘कला’ ही कला असते…
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…

‘कलेकलेनं’ वाढत जाते
‘कल्लाकाराला’ घडवते…

ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…

‘कालाचं’ बंधन नसतं तिला…
‘लक’ मात्र बरोबरीनं बाळगते…

जुळून आलं सगळं व्यवस्थित तर ‘कलाकंद’
नाहीतर सगळ्याचा ‘काला’ करुन जाते…

ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…

‘कललात’ एकदा तिच्याकडे
की पुन्हा स्वत:ला सावरता येणं महाकठीण…

आणि वेळोवेळी स्वत:ला सावरुन नाही घेता आलं
तर ‘क्लेश’ मात्र देऊन जाते…

ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…

जीवनाच्या ‘कलकलाटात’
आयुष्याला ‘कल्हई’ करुन जाते…
बेरंग, बेचव आयूष्याला
‘कलाटणी’ देऊन जाते..

पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो ‘कलासंपन्न’…
अन् नाही झेपली तर त्याला ‘कलंकित’ मात्र करुन जाते…

ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…
ती तिच्याच कलानं…

हे देखील वाचलंत का – 

पाहा व्हिडिओ – कोयना धरणातून सोडलेले पडणारे पाणी लाल का आहे? काय आहे या लाल पाण्याचे रहस्य?

 

Back to top button