औरंगाबाद : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखाचे दागिने लंपास | पुढारी

औरंगाबाद : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखाचे दागिने लंपास

पैठण, पुढारी वृत्तसेवा

पैठण शहरातील नारळा भागात राहणाऱ्या सुमन मदन गोजरे ही महिला देवदर्शन करून घरी परतत असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील कमानीजवळ ही घटना घडली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील नारळा भागात राहत असलेल्या सुमन मदन गोजरे ही महिला देवदर्शन करून घरी जात होती. संत एकनाथ महाराज मंदिराच्या कमानीजवळ त्या आल्या असता, त्यांच्या मागावर असणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व गंठण असे एकूण १ लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

या घटनेची वर्दी मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले. याबाबत पैठण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ,पो.ना जी.जी‌ पाटील हे करीत आहे.

हेही वाचा

Back to top button