जळगाव : साने-चांदी दागिन्यांसह एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास | पुढारी

जळगाव : साने-चांदी दागिन्यांसह एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

येथील सिंधी कॉलनी, कंवरनगर मध्ये राहणाऱ्या हरीष रावलानी यांनी नवीन फ्लॅट घेतल्याने, त्याठिकाणी साहित्य नेले जात होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जुन्या घरातील कपाटात ठेवलेल्या सोने-चांदीच्या दागिने व रोख रक्कम असा ५५ हजारांचा ऐवजावर डल्‍ला मारला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील सिंधी कॉलनी, कंवरनगर येथे हरीष खियलदास रावलानी (वय ५५ ) हे  राहतात. रावलानी यांनी नुकताच गणपती नगर परिसरात नवीन फ्लॅट घेतला. जुन्‍या घरातील सर्व साहित्य नवीन घरामध्ये नेण्याचे काम सुरू होते.

10 जानेवारी रोजी रावलानी कुटूंबाने शिल्लक साहित्य जुन्याच घरात ठेवून, नवीन घरामध्ये राहण्यासाठी गेले. त्यानंतर 15 जानेवारीला सकाळी ते आपल्या जुन्या घरी सामान घेण्यासाठी आले. त्‍यावेळी त्‍यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले.  त्‍यांनी खोलीत जावून पाहिले असता, कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. चाेरट्यांनी ५५ हजार रुपयांच्‍या ऐवज लांबवल्‍याची फिर्याद त्‍यांनी  एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button