MotorolaEdge30 : जगातील पहिला 200 MP कॅमेराचा स्मार्टफोन भारतात लॉन्च ; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स | पुढारी

MotorolaEdge30 : जगातील पहिला 200 MP कॅमेराचा स्मार्टफोन भारतात लॉन्च ; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : Motorola India ने भारतात आपले दोन स्मार्टफोन (MotorolaEdge30) लॉन्च केले आहेत. यामध्ये Motorola Edge 30 Ultra आणि Motorola Edge 30 Fusion या मॉडेलचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, फ्लॅगशिप Snapdragon® 8+ Gen1 प्रोसेसर आणि बरेच काही वैशिष्ट्ये आहेत. Motorola ने हे दोन्ही फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च केले होते. भारतामध्ये Motorola च्या दोन्ही फोनची स्पर्धा ही, Asus ROG 5S, Vivo X70 Pro+ आणि iQoo 9 यांसारख्या स्मार्टफोनसोबत असणार आहे.


किंमत आणि स्पेसिफिकेशन

Motorola Edge 30 Ultra

MotorolaEdge30Ultra हा जगातील पहिला* 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन (MotorolaEdge30) नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये फ्लॅगशिप Snapdragon® 8+ Gen1 प्रोसेसर, 125W TurboPowerTM चार्जिंग, 144Hz poLED डिस्प्ले, एंडलेस एज डिझाइन ही वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत ₹54,999* असणार आहे. 22 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन @Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Motorola Edge 30 Fusion

जगातील सर्वात मोहक पॉवरहाऊस – #MotorolaEdge30Fusion हा स्मार्टफोन (MotorolaEdge30) भारतात नुकताच लॉन्च केला आहे. यामध्ये फ्लॅगशिप Snapdragon® 888+ 5G प्रोसेसर, 144Hz poLED 10-बिट डिस्प्ले, 50MP कॅमेरा सिस्टीम, 68W TurboPowerTM चार्जर आणि बरेच काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या मॉडेलची किंमत ही फक्त ₹३९,९९९ असणार आहे. 22 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन @Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा:

 

Back to top button