Oppo A57e : Oppo घेऊन येत आहे बजेटवाला स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहेत वैशिष्टये | पुढारी

Oppo A57e : Oppo घेऊन येत आहे बजेटवाला स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहेत वैशिष्टये

पुढारी ऑनलाईन:ओप्पो कंपनीने नुकतेच भारतात Oppo A57e हे स्मार्टफोनचे नवीन मॉडेल (Oppo A57e ) लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन Oppo च्या A57s या मॉडेलशी साधर्म्य दर्शवतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 SoC, 6.56 इंच LCD, ड्युअल कॅमेरा असे अनेक फिचर्स आहेत. जाणून घेवूया काय आहेत या नवीन स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि वैशिष्ट्ये…

Oppo A57e काही फरकांसह जवळजवळ OPPO A57s सारखाच आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचची IPL LCD स्क्रीन आहे. ज्यामध्ये 1612 x 720 पिक्सेलची HD+ रिझोल्यूशन आहे. 600 निट्स ब्राइटनेस आणि 269 PPI अशी या स्मार्टफोनची डेनसिटी आहे. 5,000 mAh बॅटरीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला (Oppo A57e ) कंपनीकडूनच पांडा ग्लास बसवून देण्यात आली आहे.

फिचर्स आणि वैशिष्ट्ये

Oppo A57e या स्मार्टफोनमध्ये चीपदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये GB LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेज देण्याच आले आहे. यामध्ये RAM expansion हे वैशिष्ट्येही देण्यात आले आहे. याची RAM ही 4GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तर स्टोरेज 1TB पर्यंत वाढविण्यासाठी यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आले आहे. Oppo स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 13-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्याबरोबरच 2MP चा सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच यामध्ये (Oppo A57e ) सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेराही आहे.

किंमत आणि उपलब्धता

भारतात Oppo A57e या स्मार्टफोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १३९९९ रुपये असणार आहे. ओप्पोचे हे मॉडेल हिरवा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्डवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कंपनीने म्हंटले आहे.

हेही वाचा:

Back to top button