Realme चा फक्त ५ मिनिटात ५० टक्के बॅटरी चार्ज करणारा 5G स्मार्टफोन लॉन्च ! किंमत फक्त.. | पुढारी

Realme चा फक्त ५ मिनिटात ५० टक्के बॅटरी चार्ज करणारा 5G स्मार्टफोन लॉन्च ! किंमत फक्त..

पुढारी ऑनलाईन डेस्क : Realme GT Neo 3 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. लोकांमध्ये या फोनची क्रेझ आहे, पण ही क्रेझ का आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. फोनसोबत 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा या फोनचा यूएसपी आहे आणि युजर्समधील क्रेझचे कारण आहे.

Realme GT Neo 3 First look, Price, leaks, launching date full Specs | Realme GT Neo 3 5G - YouTube

कंपनीचे म्हणणे आहे की हा फोन 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 50 टक्के चार्ज होतो. आता हा कंपनीचा दावा आहे पण हा दावा खरा आहे का ? याचा आम्ही रिव्ह्यू करणार आहोत.

Realme GT Neo 3 5G डिझाइन आणि डिस्प्ले

Realme GT Neo 3 5G चे बॅक पॅनल फारसे आकर्षक नाही, पण यूझर्सना ते आवडणार नाही असे म्हणता येणार नाही. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंपनीने व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटणांना स्वतंत्र बाजू दिल्या आहेत, जे मला खूप आरामदायक आहेत. फोनचा कॅमेरा प्लेसमेंट सामान्य आहे.

 

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यासोबत 6.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचा टच सॅम्पलिंग रेट 1000Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनचा डिस्प्ले सुंदर आहे. आजवरच्या फोनच्या तुलनेत हा आकर्षक आहे. केवळ व्हिडिओ प्रेमींनाच नाही तर गेमर्सनाही हा फोन खूप आवडू शकतो. कारण त्याचा रिफ्रेश रेट आणि टच सॅम्पलिंग रेट अतिशय आकर्षक आहेत.

Realme GT Neo 3 India launch event: time, how to watch live stream, expected price, specifications | 91mobiles.com

Realme GT Neo 3 5G specs

  • 6.7-inch 10-bit 120Hz AMOLED display
  • MediaTek Dimensity 8100 SoC
  • Up to 12GB RAM, 512GB storage
  • 50MP + 8MP + 2MP triple cameras
  • 16MP selfie camera
  • 4,500mAh battery, 150W fast charging
  • Android 12-based Realme UI

Video : Realme GT Neo 3 5G

 

Back to top button