ashes 2022 : जॉनी बिअरस्टोचे झुंझार शतक; इंग्लंडचे पुनरागमन | पुढारी

ashes 2022 : जॉनी बिअरस्टोचे झुंझार शतक; इंग्लंडचे पुनरागमन

सिडनी; पुढारी ऑनलाईन : जॉन बिअरस्टोचे दमदार शतक आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळाच्या बळावर खराब सुरुवातीनंतर अखेर इग्लंडने ४ थ्या कसोटीतील ( ashes 2022 ) तिसऱ्या दिवशी सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडच्या वतीने ७ डावानंतर जॉनी बिअरस्टो याने पहिले शतक झळकावले आहे. एका वेळी इंग्लंडची अवस्था ४ बाद ३६ झाली होती. त्यानंतर जॉनी बिअरस्टो आणि बेनस्टोक्स यांनी ७ बाद २५८ पर्यंत इग्लंडला पोहचवले. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा जॉनी बिअरस्टो १०३ धावांवर तर जॅक लिच ४ धावांवर खेळत होते.

ऑस्ट्रेलियाचा ( ashes 2022 ) कर्णधार पॅट कमिन्स याचा एक जोरदार चेंडू जॉनी बिअरस्टोच्या अंगठ्याला लागला. तेव्हा जॉनीला वेदनेचा प्रचंड त्रास होत असल्याचे दिसले. तरीही त्याने न डगमगता ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर ठाण मांडले. त्याने १३८ चेंडूचा सामना करत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

जॉनी बिअरस्टोच्या या महत्त्वपूर्ण खेळीनंतर सुद्धा इंग्लंड अजून ऑस्ट्रेलिया ( ashes 2022 ) पेक्षा १५८ धांवानी पिछाडीवर आहे. त्या आधी बेन स्टोक्स याने ९१ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ६६ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याने बिअरस्टो सोबत १२८ धावांची भागिदारी रचली. नॅथन लायनने स्टोक्सला पायचित करत ही जोडी फोडली. स्टोक्सला त्याच्या खेळी दरम्यान दोन जीवनदान मिळाले. स्टोक्सचा एक झेल पॅट कमिन्सने सोडला तर पायचितच्या अपीलवर तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले.

इग्लंडने कालच्या नाबाद १३ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच षटकात २ धावांवर खेळणाऱ्या हमीदचा झेल किपर ॲलेक्स कॅरीने सोडला. पण, या जीवनदानचा हमीद फायदा उठवू शकला नाही. पुढील षटकात स्टार्कने त्याला बाद केले. दुसरा सलामीवीर जॅक क्रोली याला बोलंडने १८ धावांवर बाद केले. यानंतरच्या बोलंडच्या पुढील षटकात कर्णधार जो रुट देखिल त्याचा शिकार बनला. जेवणाच्या आधी दावेद मलानला ग्रीनने बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद ३६ अशी झाली होती.

यानंतर बेन स्टोक्सने आणि जॉनी बिअरस्टो यांनी इंग्लडंचा डाव सावरला दोघांनी १२८ धावांची भागीदारी रचली. बेन स्टोक्स माघारी परतल्यानंतर जॉस बटलर सलग दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. पुढे बिअरस्टो आणि मार्क वूड यांनी ७२ धावांची भागीदारी करत पुन्हा एकदा इंग्लंडची पडझड थांबवली. वूड याने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वूड याला कमिन्सने बाद केले. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७ बाद २५८ धावा केल्या होत्या.

Back to top button