Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला एका झटक्यात ३० बिलियन डॉलर्सचे नुकसान | पुढारी

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला एका झटक्यात ३० बिलियन डॉलर्सचे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क

जगातील सगळ्यात जास्त श्रीमंत असणाऱ्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत घट झाली. त्यांची संपत्ती ३०४ अब्ज डॉलरवर पोहचली होती, पण काही दिवसांपासून टेस्लाचे शेअर ढासळलेतं. त्यामुळे त्यांच नुकसानं झालं आहे. यामुळे त्यांच एका झटक्यात एलन मस्क यांची संपत्ती ३० अब्ज डॉलरांनी कमी झाली.

२७१ अब्ज डॉलर संपत्ती

नव्या वर्षाची सुरुवात एलन मस्क यांची चांगली झाली. टेस्लाचे शेअर रॉकेट सारखे वरती गेले. बघता बघता संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली, पण हा आकडा लगेच खाली आला. म्हणजेच, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही दिवसात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सुमारे ३० अब्ज कमावले आणि गमावले. या घसरणीनंतर टेक्सास-आधारित टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) आता अंदाजे २७१.५ अब्ज डॉलरचे मालक आहेत.

सोमवारी टेस्लाचे शेअरमध्ये १३.५ टक्क्यांनी वाढ झाली, त्यामुळे एलन मस्कच्या संपत्तीत वाढ झाली. पण मंगळवारपासून गुरुवार दरम्यान त्यांचे शेअर ढासळले. यात सगळ्यात जास्त घसरण ही बुधवारी झाली. एका दिवसात एलन मस्क यांच्या संपत्ती १४ अब्ज डॉलरनी कमी झाली. टेस्ला स्टॉक बुधवारी ५ टक्क्यांहून अधिक घसरला. या घसरणीनंतरही कंपनीचे बाजार भांडवल १.०८ ट्रिलियनचे आहे. जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ४४ टक्के अधिक आहे. (Elon Musk)

वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी मस्क यांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली होती आणि ती एका दिवसात ३०४ अब्ज डॉलर वर गेली. एलन मस्क यांनी प्रति तास १.४१ अरब डॉलर्सची कमाई केली. यामुळे, मस्क यांची एकूण संपत्ती एका दिवसात ३३.८ अब्ज डॉलर, सुमारे २,५१,७१५ कोटी रुपयांनी वाढली. जे आता २७१.५ अब्ज डॉलरवर आली आहे. (Elon Musk)

हेही वाचलत का?

Back to top button